शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आनंद जनार्दन राऊत वार्ड क्रमांक 0४.अ मध्ये चांगलीच पकड..!

शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आनंद जनार्दन राऊत वार्ड क्रमांक 0४.अ मध्ये चांगलीच पकड..!
पालघर
प्रतिनिधी.
पालघर पूर्व आंबेडकर नगर प्रभागात यंदाच्या निवडणुकीत एक नवा, तरुण आणि दमदार चेहरा मैदानात उतरला आहे. आनंद जनार्दन राऊत यांनी शिवसेना (शिंदे गट) तर्फे उमेदवारी जाहीर करताच स्थानिक राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर मजबूत पकड, तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रियता आणि लोकांशी थेट संपर्क- ही तीन मोठी शस्त्रे घेऊन आनंद राऊत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरत आहेत. आंबेडकर नगर परिसरात त्यांच्या उपस्थितीमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिकांच्या मते, “पहिल्यांदाच लढतोय, पण दमदार लढतोय…!”
असे चित्र संपूर्ण प्रभागात दिसत आहे.
त्यांच्या सोशल नेटवर्किंग मोहिमेने तरुण वर्गात विजयी लाट निर्माण केली असून घराघरात पोहोचणाऱ्या संवाद मोहिमेमुळे सर्वसामान्य मतदारांपर्यंत ते चांगल्या प्रकारे पोहोचत आहेत.
शिंदे गटाच्या नेतृत्वाचा ठाम पाठींबा, आंबेडकर नगरातील वाढते जनसमर्थन आणि राऊत यांची आक्रमक प्रचारशैली यामुळे या प्रभागात एकतर्फी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत आनंद जनार्दन राऊत हे ‘ नगरसेवक ‘ ठरणार का?
याकडे पूर्ण पालघरचे लक्ष लागले आहे!