पिंपरी चिंचवड
निगडी येथे मेट्रोच्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला…

निगडी येथे मेट्रोच्या खड्ड्यात दुचाकीस्वार पडला…
पिंपरी :- प्रतिनिधी निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक परिसरात महामेट्रोकडून मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रो कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बुधवारी (दि.२६) एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. हेल्मेट घातल्यामुळे त्याचा जीव वाचला.
निगडीतील श्रीकृष्ण मंदिरासमोरील खड्ड्यापाशी एकाची दुचाकी घसरली आणि ती खड्यात पडली. मेट्रोसाठी खोदलेल्या खड्याभोवती सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. खड्याभोवती बॅरिकेड्स, प्रकाश व्यवस्था नाही.
तसेच, काम सुरू असल्याची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत. वाहनचालकांना खोदकामाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होत आहेत, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
