Extra Header Logo
शैक्षणिक

1966 साली ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले शासकीय विद्यानिकेतन आज देशा-परदेशात आपली वेगळी ओळख.

1966 साली ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले शासकीय विद्यानिकेतन आज देशा-परदेशात आपली वेगळी ओळख.

पुणे – (प्रतिनिधी)

Oplus_16908288

*माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीतून 1966 साली ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेले शासकीय विद्यानिकेतन आज देशा-परदेशात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय कार्याने शाळेचे नाव जगभर पोहोचवले असून, याचा आपल्याला अभिमान आहे, असे गौरवोदगार राज्याचे वर्तमान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुण्यात आयोजित पाचही विद्यानिकेतच्या महामेळाव्यात व्यक्त केले.*

(चौकटीतील मजकूर)
——————————–
*यावेळी धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांना “विद्यानिकेतन रत्न” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या पुरस्कारांची संख्या आता 104 वर पोहोचल्याने समाजाच्या विविध स्तरांतून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.*

——————————–

या महामेळाव्यासाठी राज्यभरातून तसेच देश-परदेशातून सुमारे 2,000 माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षणमंत्री भुसे म्हणाले की, “ज्या शाळेने आपल्याला मान, सन्मान,प्रतिष्ठा आणि यश दिले, त्या शाळेसाठी आपण काहीतरी देणे लागतो,माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेला हातभार लावण्यासाठी ‘गिव्ह बॅक फाउंडेशन’ ही संकल्पना अत्यंत प्रशंसनीय आहे.”राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांची सशक्त संघटना उभी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विद्यानिकेतनच्या 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी राजकारण, समाजकारण,क्रीडा,शिक्षण,आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्र,व्यापार-उद्योग, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करत शाळेची प्रतिष्ठा उंचावलेली आहे.या मेळाव्यात माजी प्राचार्य दिलीप गोगटे,माजी खा.डॉ. उल्हास पाटील,मा.खा.विनय सहस्त्रबुद्धे,आ.संजय केळकर,आ. शिरीष कुमार नाईक,आ.सुनील भुसारा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.“जगलो विद्यानिकेतन –जगवले विद्यानिकेतन” “विद्यानिकेतनाचे दिवंगत तारे”,“बंधन जोडणारे हात”,“रत्न घडवणारे हात” या अद्वितीय संकल्पनांनी तीन दिवस संपूर्ण मेळावा अविस्मरणीय बनवला. अॅड.दिलीप ठाकूर,डॉ.दिलीप पुंडे, कॅप्टन नीलकंठ केसरी,बाजीराव खांदवे,नवनाथ वाठ,ब्रिजकिशोर झंवर,गिरीश आरेकर,डॉ.चंद्रकांत, रामलाल पवार,प्रदीप लोखंडे,केशव काळे,बापू कदम,डॉ.भगवान केंद्रे, प्रभाकर वाघमारे,सुदर्शन मेहकरे, भानुदास बिरादार,सतीश मांडवकर, प्रमोद सुवर्णनकार,सुदर्शन अनघडे,रमेंद्र जोशी,किशोर घराते यांच्यासह प्रत्येक बॅच मधील एका विद्यार्थ्यांला “विद्यानिकेतनीय रत्न”पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रमात 18 ते 70 वर्षे वयोगटातील मा.विद्यार्थ्यांनी गाणी,विनोद,नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.गोरखनाथ कांबळे यांचा बाहुल्यांचे नृत्य सर्वांना आवडले तर शारीरिक शिक्षणाच्या वर्गात सहभाग घेऊन शालेय आठवणी जागविल्या.सुप्रसिद्ध सिने-नृत्य दिग्दर्शक दिलीप खंडेराय आणि त्यांच्या संचाचा “महाराष्ट्राची लोकधारा” हा विशेष कार्यक्रम भरभरून दाद मिळवून गेला.राहुल भोसले यांच्यासह पंकज वेंदे,गोपाळ काळे,दिलीप ठाकूर,विजय ठुबे, अतुल कुलकर्णी,दगडू वेंदे,श्रीकांत कुलांगे,राजेंद्र गिल,अशोक सातव, लक्ष्मीकांत देशमुख,मुजफ्फर सय्यद,भरत तांबोळकर,शामराव घोरपडे,छगन नेरकर,योगेश उघडे,डॉ. संजय पवार,मोहन सांयकाळ यांनी अथक परिश्रम घेऊन महामेळावा भव्य आणि संस्मरणीय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शासकीय विद्यानिकेतनचे प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्र्यानी तात्काळ एक व्यापक बैठक मंत्रालयात बोलाविल्यामुळे महामेळाव्याची फलश्रुती झाल्याबद्दल विद्यानिकेतनीय परिवारातून राहुल भोसले व टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.आगामी महामेळावा 2027 मध्ये नांदेड येथे घेण्यात येणार असल्याची घोषणा दिलीप ठाकूर यांनी केली आहे .
——————
(बातमीचे वेगवेगळे टायटल,योग्य ते शीर्षक निवडा प्लीज )

1. विद्यानिकेतनचा पुण्यात दिमाखदार मेळावा; शिक्षणमंत्री भुसे झाले प्रभावीत

2. विद्यानिकेतनच्या ताऱ्यांचा जमाव; शिक्षणमंत्र्यांनी केली भरीव कामगिरीची प्रशंसा

3. विद्यानिकेतनची राज्यभरात उंचावलेली कीर्ती—शिक्षणमंत्री भुसेंचे गौरवोद्गार

4. विद्यानिकेतनची परंपरा राज्यासाठी आदर्श—शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे मत

5 विद्यानिकेतनच्या प्रगतीसाठी विशेष बैठक—शिक्षणमंत्री भुसेंची तातडीची घोषणा

6. विद्यानिकेतन माजी विद्यार्थ्यांची ऊर्जा पाहून शिक्षणमंत्र्यांनी दिला ‘आदर्श शाळा’चा दर्जा

7. विद्यानिकेतनच्या रत्नांचे कौतुक; शिक्षणमंत्री म्हणाले “राज्याचा अभिमान”

8. विद्यानिकेतनच्या मेळाव्यात शिक्षणमंत्री केंद्रस्थानी; पुण्यात तीन दिवस आठवणींचा सोहळा

9. देश–विदेशातील विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी एकत्र; पुण्यात रंगली मैत्रीची महापर्वणी

10. सांस्कृतिक जल्लोष, बंधुत्वाचा उत्सव आणि विद्यानिकेतनीय आठवणींचा महापूर पुण्यात उसळला

11. विद्यानिकेतनच्या जागतिक ओळखीचे शिक्षणमंत्र्यांनी केले कौतुक

12. विद्यानिकेतनचा महामेळावा पुण्यात दिमाखात; माजी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी

13.विद्यानिकेतन मेळाव्यातील उत्साहाने पुणे भारावले; आयोजन समितीवर कौतुकाचा वर्षाव

14.शिक्षणमंत्री भुसे: “विद्यानिकेतनने महाराष्ट्राला दिले हजारो हिरे ”

15. विद्यानिकेतनच्या विकासासाठी तात्काळ बैठक—शिक्षणमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

16.विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना शिक्षणमंत्र्यांची मोठी दाद

17. 2027 मध्ये नांदेडमध्ये रंगणार विद्यानिकेतनचा पुढील महामेळावा-दिलीप ठाकूर

18. विद्यानिकेतन परिवाराचा पुण्यात ऐतिहासिक मेळावा; आठवणींचा महापूर

19. विद्यानिकेतनची 59 वर्षे—परंपरा, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा नवा अध्याय

20. विद्यानिकेतन रत्न या मानाच्या सन्मानाने ऍड. दिलीप ठाकूर यांचा पुण्यात गौरव :पुरस्काराची संख्या झाली 104

21. तीन दिवस भावना, उत्साह आणि संस्कृतीचा विद्यानिकेतनीय महामेळावा पुण्यात रंगला

22. विद्यानिकेतनीय आठवणींचे दरवाजे खुलले; 18 ते 70 वयाच्या विद्यार्थ्यांनी रंगवला सांस्कृतिक जल्लोष

23. माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा नवा इतिहास; विद्यानिकेतनचे हजारो माजी विद्यार्थी एकत्र

24. विद्यानिकेतनची परंपरा, प्रतिष्ठा आणि प्रवास—पुण्यात भरला अस्मितेचा मेळावा

25.1966 च्या विद्यानिकेतन शाळेचा जागतिक उत्सव ; शाळेच्या विकासाला नवा वेग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button