भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव बौद्ध महासभा नांदेड यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा…

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव बौद्ध महासभा नांदेड यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा…
नांदेड :- उध्दव सरोदे –
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तरच्या वतीने दि.२६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दिपाने व पुष्पाने पूजन करून उपस्थित जिल्हा शाखा शहर शाखा,तालुका शाखा,वार्ड शाखांचे पदाधिकारी यांनी अभिवादन केले. त्यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड जिल्हा सरचिटणीस दामोधर सरकटे होते तर जिल्हा पदाधिकारी कॅप्टन सुरेश गजभारे,सुभाष नरवाडे,ईश्वर जोंधळे, जिल्हा संघटक पत्रकार उद्धवराव सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सैनिक शेषेराव वाघमारे,सदाशिव हनुमंते,जिल्हा पदाधिकारी शहर संरक्षण उपाध्यक्ष यशवंत ढगे,कृष्णा गजभारे डिव्हिजनल ऑफिसर तथा जिल्हा संस्कार सचिव,प्रकाश सोंडारे शहर सचिव,विश्वनाथ चौदंते वार्ड अध्यक्ष भीमघाट,मेजर जनरल सुरेश गजभारे जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष, ईश्वर जोंधळे आदिंनी मनोगत व्यक्त केले.सुभाष नरवाडे यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा कार्यालयीन सचिव स.ना.भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार जिल्हा पर्यटन सचिव जनार्दन जमदाडे यांनी मानले.शेवटी सरणंत्तय गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई पंडित,जिल्हा कोषाध्यक्ष कांबळे ताई,मेजर कर्नल आनंद झडते,उद्धवराव सरोदे जिल्हा पदाधिकारी रामराव कदम,शहर कोषाध्यक्ष व शहर शाखा,तालुका शाखा,वार्ड शाखेचे पदाधिकारी,समता सैनिक दलाचे सैनिक व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



