पी.एम श्री केंद्रीय विद्यालय,नांदेड येथे ‘आजी-आजोबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा!

पी.एम श्री केंद्रीय विद्यालय,नांदेड येथे ‘आजी-आजोबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा!
नांदेड :- उध्दव सरोदे –
येथील पी.एम श्री.केंद्रीय विद्यालय, दक्षिण मध्य रेल्वे,नांदेड येथील प्राथमिक विभागात ‘आजी-आजोबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या जीवनात आजी-आजोबांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.प्रिया भगत आणि मुख्याध्यापक श्री.राम श्रृंगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.तर शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांकडून लेझीम नृत्य आणि कुंकुम टिळा लावून आजी-आजोबांचे भव्य स्वागत करण्यात आले.यामध्ये प्रत्येक आजी-आजोबांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.या
कार्यक्रमाची सुरूवात स्वागत नृत्याने होवून त्यानंतर विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांवर आधारित गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमात आजी- आजोबांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते.या खेळांच्या विजेत्यांना शाळेतर्फे पुरस्कार (प्रोझेस) देऊन गौरविण्यात आले.यावेळी सौ.जयशिला उद्धवराव सरोदे यांचा आजी-आजोबांचे प्रतिनिधी म्हणून शाळेतर्फे मंचावर स्वागत करण्यात आले.पत्रकार श्री. उद्धवराव सरोदे आणि श्री.ए.जी. जोंधळे या आजी-आजोबांनी मंचावरून आपले मनोगत व्यक्त करून शाळेचे आभार मानले.अनेक आजी-आजोबांनी मंचावर नृत्य आणि गाणी सादर करून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मास्टर क्षितिज,स्वारित आणि नंदिनी यांनी यशस्वीरित्या पार पाडले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी सक्रिय सहकार्य करून हा संपूर्ण कार्यक्रम,सह-अभ्यासक्रम,उपक्रम प्रभारी श्री.रवी खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.श्री.रवी खराटे यांनी सर्व आजी-आजोबांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचे आभार मानले व हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.



