पुसद येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा

पुसद येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा
सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

पुसद /जागतिक दिव्यांग दिनाला संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये प्रोत्साहन दिले होते.विकलांग लोकांचे हक्क, आदर आणि काळजी यांविषयी लोकांना अधिक जागरूक करणे तसेच अपंग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश असतो.
सदर दिनाचे औचित्य साधून दिव्यांग जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना जेवण फळ वाटप करून जागतिक अपंगदिन साजरा करण्यात आला सौ वृषालीताई वडत्या, मृणाल जाधव, सीमा पापीनवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माणुसकीची भिंत फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन जाधव व अनंता चतुर मधुकर चव्हाण प्रमोद ठाकूर दीपक घाडगे शीला वाकोडे शेरयू वाकोडे व दिव्यांग जनक्रांती संघटनेचे उपाध्यक्ष बाबुशराव पवार, सदस्य शुक्ल कुमार वाकडे, तेहसीन शेख, वैशाली सोनटक्के, माणिक मिसे, मनीष जाधव, राजेश भालेकर, सुरज कुरील, संजय गोदमले, इंदू जोगदंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



