Extra Header Logo
सामाजिक

महाराष्ट्रभर होत असलेल्या अन्याय अत्याचारा बद्दल ताबडतोब कार्यवाही व्हावी

महाराष्ट्रभर होत असलेल्या अन्याय अत्याचारा बद्दल ताबडतोब कार्यवाही व्हावी- आजाद समाज पार्टी नांदेड जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले निवेदन

नांदेड :- उध्दव सरोदे –

महाराष्ट्रात दिवसेंदिवस होत असलेले अन्याय,छेडछाड,बलात्कार,अत्याचार व ईतर गंभीर घटनांच्या विरोधात नांदेड जिल्हा आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देण्यात आले व अशा गंभीर स्वरूपाच्या घटना करणाऱ्या व्यक्तींवर ताबडतोब कार्यवाही करावी अशी मागणी पार्टीचे नांदेड जिल्हा प्रभारी प्रभाकरराव वाघमारे यांच्या नेतृत्वा खाली करण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असून सुद्धा नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक पक्षांचे राजकीय बॅनर लावलेले असून सुद्धा निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासन मात्र झोपेत आहे.महाराष्ट्र निवडणूक आयोग व शासनाने ओबीसी आरक्षणाचे कारण व त्या नावाखाली लोकल बाॅडीच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करण्यात याव्यात. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकल्या मुलीवर अतिप्रसंग करून तिचा बलात्कार केला त्या नराधम आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.ता.अर्धापूर जि.नांदेड येथील कु.शितल मोरे ह्या मुलीला प्रेम व लग्नाचे आमिष देवून तिला फासावर लटकवले यातील सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.आजाद समाज पार्टीच्या नांदेड जिल्हा प्रभारी प्रभाकर वाघमारे यांच्यावर गेली दोन वर्षांपासून वेळोवेळी जिव घेणे हल्ला करणारा बाळू उर्फ बिल्ला जाधव याच्यावर मोक्का कायदा व एम.पी.डी.नुसार कार्यवाही दाखल करण्यात यावी व आरोपीला पाठीशी घालणारे तपासिक अंमलदार बालाजी किरवले यांना निलंबित करण्यात यावे.नांदेड जिल्ह्यात शिक्षण घेणे कमी व प्रेम प्रकरणाच्या घटना जास्त होत असल्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेस बंद करण्यात यावे कारण यातून पालकांची लुटमार होत आहे.सिंचन भवन विभाग क्रमांक एक मधील अधिक्षक अभियंता यांनी आशाबाई लोखंडे यांची अनुकंपाची जागा न भरता करणाऱ्या अधिक्षक अभियंत्यावर कार्यवाही करून त्याला निलंबित करण्यात यावे,अशा विविध मागण्यांचे निवेदन आजाद समाज पार्टी नांदेडच्या वतीने देण्यात आले. या निवेदनावर पार्टीचे जिल्हा प्रभारी प्रभाकरराव वाघमारे,जिल्हाध्यक्ष विनायक लोहकरे,ओबीसी महासचिव बालाजी पांचाळ,जिल्हा सचिव गोविंद कांबळे,आनंदा गाडे,मुकुंद सुर्यवंशी, संतोष गायकवाड,संतोष लोखंडे य आदिंच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button